English factories

East India Company : History

पौर्वात्य देशात व्यापार करण्यासाठी उदयास आलेल्या या कंपनीचे ‘East India Company’ असे नामकरण झाले नव्हते. साधारणपणे तिला ‘Company of merchants of London treading in East Indies’ असे ओळखले जाई. अगदी शिवकाळात तिचा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनी असा एकाच पत्रात (३० मार्च १६३६ इंग्लंडच्या राज्याचे पत्र) आहे. कालांतराने मोठे नाव वगळून हे छोटे नाव प्रचलित झाले असावे असे माझे मत आहे. Read More

Studying history

इतिहास अभ्यासाच्या वाटा

इतिहासाचा अभ्यास आणि विपर्यास कसा होतो याचे मोजक्या शब्दात सुदंर वर्णन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. कालांतराने इतिहासातील गोष्टींचा विसर आणि मग विपर्यास कसा होतो या गोष्टी ध्यानात ठेवून इतिहासाचा अभ्यास व्हावा. इतिहास संशोधन करताना शत्रुपक्षांची हकीकत सुद्धा कशी महत्वाची असते. इतिहास अभ्यासकानी इतिहास निपक्ष वृत्तिने अभ्यासावा. Read More

Jawali Bakhar

जावळीच्या मोरेंची बखर : सारांशलेखन

आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन जमत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय. Read More

Niccolao Manucci

निकोलोओ मनुची

     मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास “Storia do Mogor” लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसे आयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले. प्रसिध्द पुरंदरच्या तहाच्या वेळी हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या गोटात होता. त्याचा “भारताचा इतिहास : तैंमुरलंग ते औरंगजेब” (Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb) हे फ्रेंच चित्रपुस्तकही प्रसिध्द आहे. Read More

पन्हाळा-विशाळगड एल्गार स्मरण

 

आषाढ वद्य प्रतिपदा (१३ जुलै १६६०)

शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी या दोन विरांची आणि पन्हाळा ते विशाळगड घोडदौडीतील लढाईत झुंजणा-या झुंजार मावळ्यांची पुण्यतिथी ….. Read More