पन्हाळा-विशाळगड एल्गार स्मरण

 

आषाढ वद्य प्रतिपदा (१३ जुलै १६६०)

शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी या दोन विरांची आणि पन्हाळा ते विशाळगड घोडदौडीतील लढाईत झुंजणा-या झुंजार मावळ्यांची पुण्यतिथी ….. Read More

महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल !!

महाराष्ट्राचा भूगोल गडकोटांमध्ये गुंफून शिवछत्रपतींनी या मातीला चिलखत घातले. मराठ्यांच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे. सह्याद्रीतल्या या महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या “मराठी रियासत”च्या पहिल्या खंडाच्या समालोचनेत सुंदर लिहिले आहे. Read More

तोरण्याच्या मशाली – एक स्वप्न

     ६-७ ची संध्याकाळची वेळ असेल. मी, किरण शेलार, किरण खामकर, अमोध कुलकर्णी तोरण्याच्या खाली पोचलेलो. सगळी सामसुमच होती . रात्रीचा  ट्रेक ठरलेला. आभाळात ढगांनी गडबड चालवलेली. अंधार पडलेला म्हणायला हरकत नव्हती. हे आणले का ते आणले का गप्पा चाललेल्या तोवर पावसाने हजेरी लावली. माझी गडबड झाली कारण मी काहीच तयारीत नव्हतो. बाकीचे भिजत उभे आणि मी एका घराच्या मागे छपराच्या आडोश्याला गेलो. Read More

साष्ठीची बखर : सारांशलेखन

आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन होत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय. Read More