तोरण्याच्या मशाली – एक स्वप्न

     ६-७ ची संध्याकाळची वेळ असेल. मी, किरण शेलार, किरण खामकर, अमोध कुलकर्णी तोरण्याच्या खाली पोचलेलो. सगळी सामसुमच होती . रात्रीचा  ट्रेक ठरलेला. आभाळात ढगांनी गडबड चालवलेली. अंधार पडलेला म्हणायला हरकत नव्हती. हे आणले का ते आणले का गप्पा चाललेल्या तोवर पावसाने हजेरी लावली. माझी गडबड झाली कारण मी काहीच तयारीत नव्हतो. बाकीचे भिजत उभे आणि मी एका घराच्या मागे छपराच्या आडोश्याला गेलो. Read More

साष्ठीची बखर : सारांशलेखन

आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन होत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय. Read More

धारकरी – रायगड प्रदक्षिणेचा

१२ जानेवारीची सकाळ… हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता. खामकर बंधुनी घरुन येताना भगवा ध्वज आणला होता. कालच्या तळागड ट्रेकमधे सापडलेली काठी होतीच.. लगेच आम्ही भगवा काठीला लावला. आणि भगवा फरफरवला..!!!! Read More