धारकरी – रायगड प्रदक्षिणेचा

१२ जानेवारीची सकाळ… हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता. खामकर बंधुनी घरुन येताना भगवा ध्वज आणला होता. कालच्या तळागड ट्रेकमधे सापडलेली काठी होतीच.. लगेच आम्ही भगवा काठीला लावला. आणि भगवा फरफरवला..!!!! Read More

कर्नाळा – एक नजर पॅनोरमातुन

कर्नाळयाला आजवर ६ वा-या केल्या (म्हणजे माझी कर्नाळ्याची संपुर्ण दुर्गभ्रमंती झाली असे नाही!). उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल.. यावेळी काढले बरेचसे panorama फोटो.. दुर्ग कर्नाळ्याचे आणि भोवतालच्या परिसराचे !!! Read More

सह्याद्री

गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे
आचरणात आणु पहावे… ते कर्म थोर शिवरायांचे….
–श्रीकांत लव्हटे
     खरंच दु्र्ग पहावेत  ते सह्याद्रीचे… रांगडे, दुर्गम तितकेच प्रेमळ, मनाला सुखावणारे…शतकोनशतके हा सह्याद्री एखाद्या आजोबांसारखा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतोय. किती पिढ्या, किती राजवटी, किती सत्तांतरे पाहीलेत याने… वर्षानुवर्षे सगळ्या घडामोडी बघत, पावसाळे उन्हाळे सोसत उभा आहे. शिलाहार, भोज, मराठे या राजवटींनी याला गडकोटांचे अलंकार लेवविले. दुर्गभंजक इंग्रजांनी ते ओरबाडले. सह्याद्री सगळी सुख दुखे घेऊन उभा आहे.

Read More