१७ व्या शतकात म्हणजेच शिवकालात न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणजे दिव्य. विश्वसनीय लेखी वा तोंडी पुरावा उपलब्ध नसल्यास आरोपीला दिव्य करावे लागे. दिव्य म्हणजे आरोपीने काही कठीण (शकत्यो शारीरीक) परीक्षेतुन जायचे. दिव्याच्या सफलतेवर न्यायदान होत असे. तसे पाहीले तर ही दिव्ये आणि अचूक न्यायाचा संबंध नाहीच पण ‘सत्यमेव जयते’ या सूत्रानुसार आणि देवावरील/खरेपणावरील श्रध्देपोटी हा दिव्याचा मार्ग निघाला असावा. पुराव्याअभावी तंटा अडकला की दिव्य करावे लागे पण नंतर विश्वसनीय पुरावा मिळाल्यास गोतसभा निर्णय बदलत असे. Read More
Month: December 2014

सह्याद्रीचे सखे सोबती
आज ट्रेकचे फोटो पाहताना सह्याद्रीतल्या छोट्या सोय-यांवर लिहावेसे वाटले म्हणून ही छोटेखानी पोस्ट.
सह्याद्रीतल्या गडकोटांवर फिरताना बरेच लहान, मोठे, प्राणी-पक्षी दिसतात. ब-याच ट्रेकमध्ये आठवणीत राहतो गावातुन गडावर आपल्यासोबत आलेला कुत्रा !! आपले नी याचे नाते कसलेही नाही पण सुरवात ते शेवट आपल्यासोबत असतो. Read More